Vaishanavi Hagawane Special Report : वैष्णवी हगवणे प्रकरणात कोर्टात काय घडलं? जाणून घ्या
वैष्णवी हगवणे प्रकरणाची न्यायायलीन सुनावणी सध्या सुरु आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हगवणे कुटुंबातील संशयित आरोपी आणि त्यांचा निकटवर्तीय निलेश चव्हाणच्या कोठडीत वाढ करण्यात आलीये... आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? वैष्णवीच्या छळासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या हगवणे मायलेकाचा ताबा म्हाळुंगे पोलिसांकडे का देण्यात आला? या प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्ट का महत्वाचाचा ठरणार आहे? या सगळ्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून...
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात
मंगळवारी या प्रकरणातील आरोपींना
न्यायालयात हजर करण्यात आलं....
आजच्या सुनावणीनंतर आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आलीये...
पण आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?
हगवणेंचा निकटवर्तीय निलेश चव्हाण
याच्यावर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे....
दुसरीकडे छळवणुकीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेले
लता हगवणे आणि शशांक हगवणे
या मायलेकालाही ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली
जेसीबी विक्रीत फसवणूक केल्याच्या प्रकरणात
लता आणि शशांक हगवणेला खेड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं
दरम्यान वैष्णवीनं आत्महत्या केली नाही
तर तिची हत्या झाल्याचा कस्पटे कुुटुंबीयांचा आरोप आहे...
त्या दृष्टीनं तपास करण्यासाठी
वैष्णवीची साडी आणि तिनं ज्या पंख्याला गळफास घेतला तो पंखा
फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात येणार आहे...
त्यामुळे या प्रकरणात आता फॉरेन्सिक रिपोर्ट महत्वाचा ठरेल...
All Shows


































