Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
फुटीर खासदारांच्या जिल्ह्यांत उद्धव ठाकरेंनी दौरा केला.. पक्ष सोडणाऱ्या खासदारांवर जोरदार आगपाखड केली. तर पक्षासोबत राहिलेल्यांच्या खांद्यावर त्यांनी नवीन जबाबदारी सोपवली. मात्र या दौऱ्यातून जे साध्य करायचं होतं ते उद्धव ठाकरेंनी खरंच साध्य केलंय? या दौऱ्यानंतर फुटीर खासदारांच्या मतदारसंघातला शिवसैनिक आपल्यासोबत ठेवण्यात ठाकरे कितपत यशस्वी होणार? ठाकरे पितापुत्र महाराष्ट्र पिंजून काढणार की मातोश्रीतूनच पक्ष कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार? या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आणि अक्षय भाटकर यांनी... पाहुयात
घरातून बाहेर न पडता, मातोश्रीवर बसून उद्धव ठाकरे पक्ष हाकतात असा आरोप शिंदेंची शिवसेना आणि भाजप नेते नेहमीच करतात...
या आरोपाला महाविकास आघाडीतल्या काही मित्र पक्षांचं देखील अप्रत्यक्ष अनुमोदन मिळालेलं महाराष्ट्रानं अनुभवलंय
मात्र सहा खासदारांनी जय महाराष्ट्र केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीबाहेर पडत..
फुटीर खासदारांच्या जिल्ह्यात सभा, मेळावा, बैठका यांचा षटकार ठोकलाय..
शुक्रवारी यवतमाळपासून सुरू झालेल्या या दौऱ्याची सोमवारी शिर्डीमध्ये सांगता झाली...
मात्र या दौऱ्यातून उद्धव ठाकरेंना जे साध्य करायचं होतं ते साध्य झालंय का?
या प्रश्नावर राजकीय विश्लेषकांकडून खल सुरू आहे
All Shows































