Three Language Formula : महाराष्ट्रात पहिलीपासून त्रिभाषा, विद्यार्थ्यांची परीक्षा? Special Report
हिंदीवरून राजकारण सुरू झालं असलं तरी खरा मुद्दा आहे तो पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा...सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणावर बोट ठेवत शाळांमध्ये तीन भाषा शिकवण्याचा निर्धार दाखवून दिलाय...पण त्यावरूनच राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलंय... पहिल्या इयत्तेपासून विद्यार्थ्यांवर तीन भाषांचं ओझं लादायचं का, हा प्रश्न यानिमित्तानं ऐरणीवर आलाय. पाहुया त्यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट...
राज ठाकरे - गुजरात सरकारचा जीआर आहे पहिली पासून गुजराती गणित आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे. तिथ देखील हिंदी भाषेची सक्ती नाही.
R CHIKHLI CM SANT PITH PROGM LIVE 180625 -
राष्ट्रीय शिक्षण धोरणात तीन भाषा सूत्र घेतल्यामुळे आपल्याला ते स्वीकारावे लागेल, म्हणून पहिलीला तिसरी भाषा शिकवावी लागेल.))
VO
महाराष्ट्र सरकारच्या नव्या जीआरनुसार राज्यातल्या विद्यार्थ्यांना आता दोनऐवजी तीन
भाषा शिकाव्या लागणार आहेत...
मराठी आणि इंग्रजीच्या जोडीला तिसऱ्या भाषेसाठी हिंदीसोबतच इतर भारतीय भाषा शिकण्याचे पर्याय आहेत...
पण तिसऱ्या अधिकच्या भाषेचा भार विद्यार्थ्यांवर कशासाठी यावरून वाद पेटलाय...
गुजरात आणि दक्षिण भारतातल्या राज्यांचा दाखला देत राज ठाकरेंनी सरकारला सवाल विचारलेत...
BYTE २ WIN
राज ठाकरे - गुजरात सरकारचा जीआर आहे पहिली पासून गुजराती गणित आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे. तिथ देखील हिंदी भाषेची सक्ती नाही.
तुम्ही आमच्या राज्यात तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करताय
तिसरी भाषा अनिर्वाय नाही मग पुस्तक छपाई का सुरू आहे
VO
राज ठाकरेंच्या या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा हवाला देिलाय...आणि
त्रिभाषा सूत्र स्वीकारावंच लागेल, असं स्पष्ट केलंय...
BYTE
((देवेंद्र फडणवीस
((राष्ट्रीय शिक्षण धोरणात तीन भाषा सूत्र घेतल्यामुळे आपल्याला ते स्वीकारावे लागेल, म्हणून पहिलीला तिसरी भाषा शिकवावी लागेल.))
VO
त्यावरून राज ठाकरेंनी पुन्हा फडणवीसांना पत्र लिहित त्यांचा दावा खोडून काढण्याचा
प्रयत्न केलाय...
GFX IN
सोबत राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा दुवा देतो आहे. त्यातील पान क्रमांक १३ आणि १४ कडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. पान १३ मध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की "अगदी सुरूवातीला मातृभाषेतून वाचन आणि नंतर लेखन अशी कौशल्यं शिकवावीत आणि इयत्ता तिसरीनंतर दुसरी भाषा शिकवावी."
पान १४ मध्ये असं म्हटलं आहे की ".. तीन भाषा सूत्र हे लवचिक आहे आणि कुठल्याही राज्यावर कुठलीही भाषा लादली जाणार नाही."
पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठे म्हटलं आहे? कृपया सांगावं.
GFX OUT
VO
आता ज्या नव्या शैक्षणिक धोरणावरून हा वाद सुरू आहे त्या धोरणात भाषेबद्दल नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात...
GFX IN
आर-१ ( वाचन, लेखन - १)
वयाच्या आठव्या वर्षापर्यंत ( इयत्ता - ३ )
ही विद्यार्थ्यांना सर्वात परिचित भाषा असावी, जी मातृभाषा असेल
जर व्यावहारिक कारणांमुळे हे शक्य नसेल, तर ती राज्यभाषा असावी
इतर विषयांसाठी हीच भाषा शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरली जावी
-----------------------------
आर-२ (वाचन, लेखन - २ )
आर-१ व्यतिरिक्त कोणतीही भाषा
वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत ( इयत्ता - ६ )
-----------------------------
आर-३ (वाचन, लेखन -३)
आर-१ आणि आर-२ व्यतिरिक्त कोणतीही भाषा
वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत ( इयत्ता -१०)
आर-१, आर-२, आर-३ पैकी किमान दोन भाषा भारतीय असाव्यात
-----------------------------
VO
शिक्षण तज्ज्ञ आणि मराठी भाषा चळवळीतल्या संघटनांचाही पहिलीपासून त्रिभाषा सूत्राला विरोध आहे...
BYTE
बाईट- दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र अध्यक्ष
बाईट- रमेश पानसे, शिक्षण तज्ञ ( शालेय शिक्षण विभागाच्या सुकाणू समितीतील सदस्य )
BYTE
यशवंत
व्हिओ २
२०२० मध्ये आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाला विरोध झाल्यानंतर त्यातून हिंदीसक्ती काढून टाकण्यात आली होती...
मातृभाषेला प्रोत्साहन देणारं हे धोरण असल्याचं सांगण्यात आलं होतं...
दक्षिणेत तामिळनाडू सरकारनं या नव्या शैक्षणिक धोरला कडाडून विरोध केला...
आणि त्रिभाषा सूत्र राबवणार नसल्याचं ठणकावलं...
अगदी मोदी-शाहांच्या गुजरातमध्येही त्रिभाषा सूत्र हे पहिलीपासून नसून तिसरीपासून आहे...
त्यामुळे महाराष्ट्र सरकार त्रिभाषा सूत्राचा अट्टाहास का करतंय असा सवाल विचारला जातोय...
एन्ड पिटीसी-
त्रिभाषा सूत्र ला आणि तृतीय भाषा म्हणून हिंदीचा समावेश इयत्ता पहिली पासून करण्याला जर एवढा विरोध राज्यात होत असेल तर यावर शालेय शिक्षण विभाग तातडीने निर्णय मागे घेणार ... की घुमून फिरवून परत तो शासन निर्णय नव्याने जारी करून पुन्हा वाद निर्माण करणार? हे पाहावे लागेल
All Shows

































