Penguins चा राजेशाही थाट! पेंग्विन पुन्हा एकदा वादात, खर्चावरुन काँग्रेसची टीका
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : आदित्य ठाकरे यांची संकल्पना असलेले राणी बागेतील पेंग्विन पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. मुंबई महापालिकेच्या राणी बागेतील पेंग्विन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. मुंबई महापालिकेत पेंग्विनवरचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. तीन वर्षांच्या पेंग्विनच्या देखभालीसाठी 15 कोटींचं टेंडर काढण्यात आलं आहे. त्यामुळेचे पेंग्विनवर होणाऱ्या खर्चावर काँग्रेसने निशाणा साधलाय.
यापूर्वीही गेल्या तीन वर्षांसाठी 11 कोटींचं टेंडर काढले होते. पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेचेच डॉक्टर नेमले जाणं शक्य असतांनाही बाहेरुन टेंडर काढून कंत्राटदार नेमण्याची गरज काय असा सवालची काँग्रेसचे मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला.
यापूर्वीही मुंबईच्या राणीबागेत पेंग्विन आणण्यावरुन आणि त्यांच्या खर्चावरुन या प्रकल्पाला विरोध झाला होता. एकीकडे कोरोना, लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना पेंग्विनच्या आलिशान लाईफस्टाईलवर एवढा खर्च कशासाठी हा सवाल विरोधकांनी केलाय.