Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...
Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...
Saif Ali Khan Attacked Updates: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला (Saif Ali Khan Attacked Updates Marathi News) होऊन दोन दिवस उलटले तरीही अजूनही हल्लेखोर मोकाट आहेत. 40 ते 50 जणांची चौकशी पण पोलिसांचे हात रिकामेच असल्याचे पाहायला मिळत आहे. याचदरम्यान सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीचे विविध सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी वांद्र्यामधून दादरमधील कबूतर खाना परिसरात गेल्याची माहिती समोर आली आहे. इथल्या एका मोबाईल दुकानामध्ये आरोपीनं इअरफोन खरेदी केला. सैफ अली खानवर हल्ला करुन तेथून पळ काढल्यानंतर आरोपी 7 तासांनी दादारमधील मोबाईलच्या दुकानामध्ये दिसला. यादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. आरोपीने दुकानामधून 50 रुपयांच्या इअरफोनची खरेदी देखील केली.