Taj Mahal मुघलांचा नाही? Allahabad कोर्टात ताज महालाचे बंद असलेले 22 दरवाजे उघडण्यासाठी याचिका
abp majha web team
Updated at:
11 May 2022 11:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTaj Mahal : ताज महालातील 22 खोल्या उघडण्याच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील आजची सुनावणी टळली आहे. मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी म्हणजेच, आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुनावणी होणार होती. मात्र वकिलांच्या संपामुळे सुनावणी होऊ शकली नाही. आता पुढील सुनावणी गुरुवारी होण्याची शक्यता आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात ताजमहालमध्ये बंद असलेल्या 22 खोल्या उघडण्यात याव्यात, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर, याची एएसआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील याचिकेतून करण्यात आली आहे.