Jaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVE

Continues below advertisement

Jaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVE

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुतील घवघवीत यश मिळाल्याने महायुतीमधील सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन अभिनंदन करण्यासाठी मोठी रांग लागली आहे. तर, दुसरीकडे विजयी आमदारांसोबत बैठक घेऊन पक्षाचे प्रमुख नेते सत्तास्थापनेवर चर्चा करत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आणि उत्कंठा राज्याला लागली असून दुसरीकडे आमदारांनीही मंत्रीपदासाठी कोट शिवले आहेत. त्यातच, शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आमदारांना मुंबईत आणण्यासाठी खास खासगी जेट पाठवले आहे. त्यामुळे, मुंबईत नेमकं काय होणार याची उत्सुकता मतदारसंघातील नागरिकांना लागली आहे. विशेष म्हणजे कालच अपक्ष निवडून आलेल्या आमदारासाठीही एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवले होते. त्यानंतर, जुन्नर विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली होती. आता, आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यासाठी खास जेट थेट हैदराबादला पाठवण्यात आलं. 

विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व आमदारांना तात्काळ मुंबईला बोलविले आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे निवडून आल्यानंतर वैद्यकीय कामानिमित्त त्यांना तत्काळ हैदराबाद येथे जावं लागलं होतं ते काम आटपून आमदार बांगर उद्या मुंबईला जाणार होते. परंतु, त्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी बांगर यांना घेण्यासाठी मुंबईवरून एक प्रायव्हेट विमान हैदराबाद येथे पाठवलं आहे. त्या विमानातून प्रवास करत आमदार संतोष बांगर यांना तत्काळ मुंबईला बोलवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार आज सायंकाळी पाच वाजता आमदार संतोष बांगर त्या प्रायव्हेट जेटमध्ये बसून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. बांगर यांना एवढ्या घाई गडबडीत का बोलण्यात आले हे अजून समजू शकलेलं नाही. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडामोडी सुरू आहेत याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram