Mushroom Farming | गुरांच्या पडक्या गोठ्यात केली मशरूमची लागवड, मशरूममधून हजारोंचा नफा | रत्नागिरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Feb 2021 03:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणात देखील आता सर्वसामान्य शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अनंत वाडेकर यांनी आपल्या गुरांच्या पडक्या गोठ्यात अळंबी अर्थात मशरूमची शेती यशस्वी केली आहे. त्यासाठी त्यांनी सुरूवातीला केवळ हजार रूपयांची गुंतवणूक केली. त्यातून त्यांना सध्या महिन्याकाठी 25 हजार रुपये मिळत असून सारा खर्च वगळता 15 ते 17 हजारांचा नफा सहज होत आहे. सद्स्थितीला जिल्ह्याचा विचार करता दक्षिण भागातील चार तालुक्यांमध्ये तरी वाडेकर यांनीच हा अशा प्रकारचा नवा प्रयोग केला आहे.