Special Report Pandharpur : माऊली कॉरिडॉर वादात अडकणार? विकास आराखडा आणि वाद सुरु : ABP Majha
एकाबाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री कधी जत तरी कधी सोलापूर अक्कलकोटला कर्नाटकात जोडण्याची भाषा करीत असताना आज पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर विरोधी आंदोलनकर्त्यांनी आमच्यावरील अन्याय दूर न झाल्यास आषाढीला कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा मतप्रवाह तयार होत असल्याचे धक्कादायक वक्तव्य केल्याने खळबळ माजली आहे . मंदिर परिसरात भविष्यात भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देता याव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखडा आणि माउली कॉरिडॉर राबविण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे . एका बाजूला शासन या बाधित नागरिक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करीत असताना दुसऱ्या बाजूला यासाठीचे टेंडर प्रसिद्धीस दिल्याने असंतोष वाढत चालला आहे .
All Shows


































