रहिवासी इमारतीत परवानगी न घेता अनधिकृत हॉटेल सुरु केल्याने मुंबई महापालिकेची सोनू सूदविरोधात तक्रार
एबीपी माझा वेब टीम | 07 Jan 2021 11:50 PM (IST)
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतनंतर आता अभिनेता सोनू सूद मुंबई महापालिकेच्या निशाण्यावर आहे. कारण बीएमसीने सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोनू सूदने जुहूमधील सहा मजली राहिवाशी इमारतीत आवश्यक परवानगीशिवाय अनधिकृत हॉटेल सुरु केल्याचा ठपका बीएमसीने ठेवला आहे. एमआरटीपी कायद्याअंतर्गत सोनू सूदविरोधात तक्रार दाखल करावी, असं बीएमसीने जुहू पोलिसांना सांगितलं आहे.