Sudhir Mungantiwar on BJP : पक्षनेतृत्वाकडून गटबाजीबाबत विधान, सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर?

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar on BJP : पक्षनेतृत्वाकडून गटबाजीबाबत विधान, सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर?

नगरपरिषद आणि नगरपंचायत निकालांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला असला... तरी विदर्भात भाजपच्या निराशाजनक कामगिरीवरून.. माजी मंत्री आणि नेते सुधीर मुनगंटीवारांनी घरचा आहेर दिलाय..  चंद्रपूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांपैकी ७ नगरपरिषदांवर काँग्रेसनं नगराध्यक्षपद खेचून आणलंंय.. आणि यावरूनच, चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या हाराकिरीमुळे पारा चढलेल्या मुनगंटीवारांनी, थेट पक्ष नेतृत्वावरच संताप व्यक्त केलाय...

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाच वरचष्मा पहायला मिळतोय. २८८ पैकी १२४ जागांवर भाजपाचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आलेत..यामध्ये ३४ पैकी ३२ जिल्ह्यांमध्ये भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झालेत.. फक्त नंदुरबार आणि हिंगोली जिल्ह्यांत भाजपची पाटी कोरी राहिली आहे. भाजपापाठोपाठ शिंदेंची शिवसेना निकालामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय... शिंदेंच्या शिवसेनेचे ६१ नगराध्यक्ष निवडून आलेत... त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३६ उमेदवार नगराध्यपदी विजयी झालेत.. दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकांमध्येही मविआला मोठा धोबीपछाड मिळालाय. मविआतील तिन्ही पक्षांना मिळून ५०चा आकडाही पार करता आलेला नाही... तिन्ही पक्षांचा मिळून फक्त ४७ जांगांवर विजय झालाय.. त्यामध्ये काँग्रेसला २७, ठाकरेसेनेला ८ तर पवारांचे १२ उमेदवार नगराध्यपदी विजयी झालेत...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola