New Shephard : Kalyan : अमेरिकेच्या Space Tourism च्या टीममध्ये कल्याणच्या संजल गावंडेची निवड
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकल्याण : अंतराळ, स्पेस सायन्स, रॉकेट यांचं आकर्षण सर्वानाच असतं. मात्र आकर्षणाच्या पलिकडे जात कल्याणमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने मोठी झेप घेतली आहे. अंतराळात झेपावणारे यान बनवणाऱ्या टीममध्ये कल्याण पूर्वमधील संजल गावंडे या तरुणीचा समावेश आहे. त्यामुळे कल्याण शहराची पताका थेट अंतराळात आणि पर्यायाने अमेरिकेत फडकली आहे. अमेरिकेमधील 'ब्ल्यू ओरिजिन' या स्पेस कंपनीने अंतराळ सफरीची घोषणा केली आहे.
येत्या 20 जुलैला या कंपनीतर्फे 'न्यु शेफर्ड' हे खासगी यान जगप्रसिद्ध ब्रँड अमेझॉनचे संस्थापक आणि ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्यासह काही निवडक पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे. हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या टीममध्ये कल्याणमधील संजल गावंडे हिचा समावेश आहे. इंजिनीअरीगचे शिक्षण पूर्ण करत विविध परीक्षा देत संजल हिने या उंचीवर झेप घेतली आहे.
संजलच्या या यशामुळे तिच्या कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या संजल हिची आई सुरेखा गावंडे या एमटीएनएलमधील तर वडील अशोक गावंडे हे केडीएमसीतील निवृत्त कर्मचारी आहेत.अतिशय कठीण परिस्थितीत तिने हे यश मिळवल्याचे तिच्या आईने सांगितले. कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स याच्या सारखे अंतराळात जाण्याचे संजलचे स्वप्न आहे आणि ते ती पूर्ण करणार, असा विश्वास तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.