Special Report Salim Kutta:सलीम कुत्ता जिवंत की मृत, गोरंट्याल आणि बडगुजरांच्या दाव्याने नवी चर्चा
abp majha web team | 18 Dec 2023 01:59 PM (IST)

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एका हस्तकाची सध्या जोरदार चर्चा आहे. तो म्हणजे सलीम कुत्ता. याच सलीम कुत्ताच्या पार्टीत ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर सहभागी असल्याचा आरोप झालाय. त्यावरुन आता मोठा वाद सुरु असतानाच, आता तो जिवंत आहे की मृत याची चर्चा रंगली आहे. १९९८ मध्ये सलीम कुत्ताची रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. तर ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी देखील कुत्ताचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय.