Make In Varur Jaulka | बैलजोडीला पर्याय म्हणून बनवला ट्रॅक्टर, शुभम कात्रे या अंभियंत्याची कमाल!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Oct 2020 10:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतात झोकात अन् ऐटीत वखरणी, डवरणी करणारा हा ट्रॅक्टर, अन् हा ट्रॅक्टर बनलाय फक्त अन फक्त 35 हजार रुपयांमध्ये. तोही संपूर्णपणे 'मेक इन वरूर जऊळका'... अकोला जिल्ह्यातील वरूर जऊळका गावातील शुभम कात्रे हा या ट्रॅक्टरचा अन जुगाडाचा 'जन्मदाता'... शुभमचं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरपर्यंत झालेलं. कोरोनामूळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे शुभम पुण्यातून गावी परत आला होताय. यावर्षी परिस्थितीमूळे वडील संजय यांना आपली नऊपैकी तीन एकर शेती विकावी लागलीय. अन सोबतच आपली बैलजोडीही... बैलजोडी नसल्याने अन ट्रॅक्टरच्या भाडं परवडत नसल्याने शुभमच्या वडिलांची मोठी तगमग होत होतीय. अन हीच परिस्थिती शुभमच्या ट्रॅक्टरच्या जन्माला कारणीभूत ठरलीय.