ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील वाद चव्हाट्यावर.. महाराष्ट्र सरकारकडून रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द

बीडमधील खंडणीखोर वाल्मिक कराडच्या जामीनावर आज सुनावणी, दोन कोटींच्या खंडणी प्रकरणी जामीन मिळाला तरी जेलमधून सुटका नाहीच, निर्णयाची उत्सुकता 

सैफ खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं कबूल केला गुन्हा... १०० पोलिसांच्या टीमनं आवळल्या मुसक्या... भुर्जी पावच्या ऑनलाईन पेमेंटमुळे  सापडला ठावठिकाणा...

पन्नास हजार रुपयांसाठी हल्लेखोराचा सैफच्या घरी चोरीचा प्रयत्न, सूत्रांची माहिती... सगळ्या गेटवर सुरक्षा नसल्यानं सैफचीच बिल्डिंग टार्गेट, आरोपीचा कबुलीजबाब...

हल्लेखोराच्या कबुली जबाबानंतर पोलिस गुन्ह्याचं नाट्यरुपांतर करुन बारकावे गोळा करणार, उपचारानंतर  सैफच्या डिस्चार्जवर आज निर्णय 

नंदुरबार शहरात दगडफेक,... जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून अश्रु धुराचा मारा... शहरात तणावपूर्ण शांतता ...

इस्रायल हमास दरम्यान शस्त्रसंधी अंमलबजावणीला सुरुवात, तब्बल १५ महिन्यांपासून सुरु असलेल्या युद्धाला  अखेर विश्रांती, गाझा पट्टीत मदतसामुग्री रवाना

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram