Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत
Continues below advertisement
Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत
आगामी काळात महायुतीतील पक्षच आमने सामने येतील अशीच चिन्ह दिसत आहेत. भाजप सदस्य नोंदणीची जिल्हा आढावा बैठक शनिवारी नांदेडमध्ये झाली. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू असे स्पष्ट केले. देशासह राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवू. असे स्पष्ट संकेत अशोक चव्हाण यांनी दिले. आपली ताकद शहरात आहे, जिल्ह्यात आहे. आम्ही घटक पक्षाच्या विरोधात नाही, मात्र आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला अधिकार आहे. त्यात गैर मानण्याचे काहीच कारण नाही. असे ही अशोक चव्हाण म्हणाले.
Continues below advertisement