Ajit Pawar NCP Setback Special Report : अजित पवार यांचे आमदार फुटणार? राज्यात परिस्थिती काय?

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar NCP Lok Sabha Result : लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या चार पैकी तीन उमेदवारांचा दारुण पराभव झाला. अजित पवारांना आपल्या बालेकिल्ल्यात देखील झेंडा रोवता आलेला नाही. मागच्या निवडणुकीमध्ये मुलाला उभं केलं, पण तो हरला आणि आणि आता पत्नी देखील पराभूत झाली. त्यामुळे या पराभवाचा राष्ट्रवादीला मोठा झटका बसल्याचं बोललं जातंय. अजितदादांना बंडखोरी तर नडली नाही ना? असा गंभीर प्रश्न देखील उपस्थित होतोय.
जागा वाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त 4 जागा आल्या होत्या. बारामती, शिरुर, धाराशिव आणि रायगड. रायगडची जागा वगळता इतर तिन्ही जागांवर दादांचे उमेदवार पराभूत झाले. या चारही जागांचा सखोल आढावा घेऊयात.
बारामती लोकसभा मतदारसंघ
सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार. बारामती लोकसभा मतदार संघातून शरद पवार राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी अशी लढत झाली. दोन्ही उमेदवार पवार घराण्यातील सदस्य. नणंद विरुद्ध भावजय अशी अटतटीची लढत झाली. या आरपारच्या लढाईत सुनेत्रा पवारांचा 1 लाख 58 हजार 333 मताधिक्याने पराभव झाला. तर खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा खासदार झाल्या. त्यांना 7 लाख 32 हजार 312 मतं मिळाली. अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी दिवसरात्र एक केलं, ठिकठिकाणी सभा घेतल्या, गाव न गाव पिंजून काढलं. पण यश मात्र त्यांच्या पदरी पडलं नाही.
शिरुर लोकसभा मतदारसंघ
या मतदारसंघात देखील पवार काका विरुद्ध पुतण्या असा जंगी सामना पाहायला मिळाला. राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.पण हा निर्णय दादांना रुचला नाही. म्हणून दादांनी या मतदारसंघात विशेष लक्ष दिलं. कोल्हेंना जमेल तितका विरोध केला, त्यांच्यावर सडकून टीका केली.
शिवसेनेतून तिकीट न मिळाल्यानं शिवाजी आढळरावांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढले. 2019 साली अजितदादांनी कोल्हेंना प्रथम संधी दिली. तेव्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील असा सामना झाला होता. मागच्या वेळी ज्यांचा विरोध केला त्यांचाच घडाळ्याच्या चिन्हावर लढायला लावलं आणि त्याचा प्रचार केला. विशेष म्हणजे अमोल कोल्हे दोन्ही वेळेस भरघोस मतांनी निवडून आले.