सत्तांतरानंतर Raj Thackeray - Eknath Shinde यांच्या 5 वेळा भेटी, राज्यात युतीची चाहूल?
abp majha web team
Updated at:
03 Nov 2022 04:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी गेल्या काही दिवसांपासून वाढत चालल्या आहेत. कधी एकमेकांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी, कधी शिवाजी पार्कातला दीपोत्सव, तर कधी एखाद्या एका उद्योजकाच्या समाजोपयोगी प्रकल्पासाठी अशा मिळून त्यांच्या तीन भेटी झाल्या होत्या. त्यापाठोपाठ आज राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली ती महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यानिमित्त. या सतत होणाऱ्या भेटींमागे आगामी काळातील युतीची नांदी तर नाही ना अशी चर्चाही आता रंगू लागलीय. पाहूयात एबीपी माझाचा रिपोर्ट.