Eknath Shinde : एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल, शिवसेनेच्या आमदारांसोबत बैठक

Continues below advertisement

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात चाचणी केल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल, थोड्याच वेळात शिवसेनेच्या आमदारांसोबत बैठक

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आज दुपारच्या सुमारास ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या ज्युपिटर रुग्णालयात काही चाचण्या, तपासण्या करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचं ज्युपिटर रूग्णालयात चेकअप केल्यानंतर आमि काही तपासण्यानंतर ते रुग्णालयातून बाहेर पडले. यानंतर ते वर्षा बंगल्याकडे रवाना झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना ताप, सर्दी आणि घशाचा संसर्ग झाला होता. तसेच त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपासून शिंदे (Eknath Shinde) आजारी आहेत. आजारपणामुळे त्यांनी साताऱ्यातील दरेगावात दोन दिवस मुक्काम केला. त्यानंतर ते ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी आराम करत आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल (सोमवारी) रात्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी शिंदे यांना सलाईन लावली होती, अशी माहिती गिरीश महाजनांनी नंतर माध्यमांना दिली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ॲक्शन मोडमध्ये दिसून येत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून त्यांनी पक्षातील आमदारांच्या भेटी टाळल्या होत्या. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वर्षा बंगल्यावर पोहोचल्यानंतर पक्षातील इतर नेते आणि आमदार वर्षावर दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात परवा(गुरूवारी) शपथविधी पार पडणार आहे, मात्र अद्याप जागावाटपाच्या बाबतीत पेच आहे, तो सोडवण्याचा देखील प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याचबरोबर शिंदे आपल्या आमदारांची बैठक घेऊन आगामी निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram