ABP Majha Headlines : 4 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात चाचणी केल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल, थोड्याच वेळात शिवसेनेच्या आमदारांसोबत बैठक

एकनाथ शिंदेंच्या आजारपणाचे चुकीचे अर्थ काढू नका, गुलाबराव पाटलांचं आवाहन, शिंदे स्थिरस्थावर झाल्यावर सवाल उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देऊ, शंभूराज देसाईंचा इशारा

शपथविधी ५ डिसेंबरला हे बावनकुळेंच्या ट्विटवरून समजलं, माजी मंत्री उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य, सागर बंगल्यावर सामंतांनी घेतली फडणवीसांची भेट

शपथविधीच्या तयारीसाठी भाजप नेत्यांची लगबग, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, भाजपचे निरीक्षक संध्याकाळी मुंबईत येणार

महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी, शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट उपस्थित, संध्याकाळी महायुतीच्या बैठकीची शक्यता

अजित पवारांच्या दिल्लीवारीचं कारण एबीपी माझाच्या हाती, स्ट्राईकरेटच्या आधारे राष्ट्रवादीची मंत्रिपदाची मागणी, भाजप श्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, हिंदुत्त्वाचा मुद्दा प्रखरतेने पोहोचवण्याचे ठाकरेंचे आदेश, स्वबळावर लढण्याचा माजी नगरसेवकांचा सूर

जिथे असशील तिथून उचलून आणू..., मोहित कंबोज यांचा एक्स युजर गजाभाऊला थेट इशारा, महाराष्ट्रात धमक्यांना थारा नाही, दानवेंचं उत्तर

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola