परळीत पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या बॅनर्सवरून भाजपचे बडे नेते गायब
बीड : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. परंतु या बॅनर्सवर एकाही भाजपच्या बड्या नेत्यांचा फोटो नसल्याने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने बीड, अहमदनगरमधून अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी मुंबईत या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढून त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. मात्र असे असताना देखील समर्थकांमधील नाराजी कायम असल्याचं या बॅनर्सवरून पुन्हा एकदा उघड झाल आहे.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























