✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Pahalgam Terror Attack : शोकाकुल Dombivli, सुन्न महाराष्ट्र; अंगावर काटा आणणारी कहाणी Special Report

abp majha web team   |  23 Apr 2025 11:29 PM (IST)

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी या तिघांना प्राण गमवावे लागले.. एकमेकांचे नातेवाईक असलेल्या या तिघांमधला जिव्हाळा नातेवाईकांमध्ये नेहमीच कौतुकांचा विषय असायचा..लेकरांची परीक्षा संपली म्हणून ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते.. मात्र बैसरनच्या खोऱ्यात त्यांची गाठ माणसाच्या मुखवट्याड दडलेल्या सैतानांशी पडली... त्यानंतर पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्याही डोळ्यात अश्रू आणि मनात संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही....


संजय लेले


अतुल मोने


हेमंत जोशी


एकमेकांचे नातेवाईक असलेल्या या तिघांनी, अनेक सुख-दुखाच्या प्रसंगात एकमेकांची कधीच साथ सोडली नव्हती...


अखेरचा श्वास घ्यायची वेळ आली, तेव्हा देखील यात खंड पडू दिला नाही..


पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली पश्चिमचे रहिवासी असलेल्या या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय..


संजय लेलेंची पत्नी ही हेमंत जोशींची आते बहीण तर अतुल मोनेंची मामेबहीण


मुलांच्या परीक्षा संपल्यानं तिन्ही कुटुंबांनी एकत्र काश्मीरला जाण्याचा प्लॅन आखला


काश्मीरला जाण्यासाठी  विमानात बसल्यानंतर हेमंंत जोशी, त्यांची पत्नी आणि मुलगा ध्रुवच्या चेहऱ्यावरचं हास्य कॅमेऱ्यानं टिपलं होतं


ध्रुवच्या दहावीमुळे वर्षभर कुठेच जाता न आल्यानं, यंदाची सुट्टी त्यांना काश्मीरमध्ये घालवायची होती


संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी आपल्या कुटुंबासह मिनी स्वित्झरलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये पोहोचले..


एकीकडे निसर्गानं केलेली सौंदर्याची उधळण तर दुसरीकडे देशभरातून आलेल्या पर्यटकांकडून आनंदाची उधळण


याच आनंदोत्सवाचे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह संजय लेलेंना आवरला नाही


सर्व पर्यटक फुलपाखराप्रमाणे बैसरन खोऱ्यामध्ये बागडत असतानाचा अचानक गोळीबाराचा आवाज सुरू झाला


गोळीबाराचा आवाज ऐकून पर्यटकांची धावपळ सुरू झाली


जो तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी पळू लागला..


दहशतवाद्यांनी प्रत्येलाकाला धर्म विचारला..
जे मुस्लिम नव्हते त्यांना पत्नी आणि मुलाबाळांदेखल गोळ्या झाडल्या..


दहशतवादी हल्ल्यात संजय लेले , अतुल मोने
, हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला...


हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव देखील गोळीबारात जखमी झाला


जेव्हा ही बातमी धडकली तेव्हा तिन्हा कुटुंबांच्या पायाखालची जमीनच सरकली


संजय लेले , अतुल मोने, हेमंत जोशी यांच्या मृत्यूमुळे फक्त डोंबिवलीवरच नव्हे तर महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय..

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Pahalgam Terror Attack : शोकाकुल Dombivli, सुन्न महाराष्ट्र; अंगावर काटा आणणारी कहाणी Special Report

TRENDING VIDEOS

Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report9 Hour ago

Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?9 Hour ago

NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report9 Hour ago

Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?9 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.