Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

Continues below advertisement

Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

पुण्यात राजकीय समीकरणांची गुंतागुंत कमी होण्याचं नावंच घेत नाहीय. अजित दादांची राष्ट्रवादी- शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाणारंय पण त्याला राशपमधील काहींचा विरोध आहे. अजितदादा मविआसोबत जाणार त्याला ठाकरेसेनेचा विरोध आहे, अजितदादा काँग्रेसलाही सोबत बोलावतायत, त्याला काँग्रेसमधील  काहींचा विरोध आहे. तिथे कुणाला कुणासोबत जायचंय आणि त्याला कुणाचा विरोध आहे, पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दिवसागणिक समीकरणं बदलत आहेत  मंगळवारी तर दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांच्या दिवसाची सुरुवात वेगवान घडामोडींनी झाली  दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढायचं ठरल्याचा दावा  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी केला  २५ किंवा २६ डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होईल अशी घोषणाच त्यांनी केली.  शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी ते आग्रही होते हे विशेष
अजितदादांसोबत जाण्यावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पुण्यात दोन गट पडलेले आहेत.   त्यातही प्रशांत जगताप यांचा एकत्र येण्याला तीव्र विरोध आहे.  अजित पवार महायुतीसोबत सरकारमध्ये असताना त्यांच्याशी आघाडी कशी करायची असा प्रश्न त्यांनी विचारला.  त्यांच्याच पक्षाच्या अंकुश काकडे यांनी तुतारीवर लढण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं तसंच  दादांनी फुले, शाहू, आंबेडकरी  विचारधारा सोडली नसल्याचं प्रमाणपत्रही देऊन टाकलं
पुण्यातील घडामोडींवर सुप्रिया सुळे यांनी नेहेमीप्रमाणेच पॉलिटिकली करेक्ट प्रतिक्रिया दिली.  त्यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मात्र अजितदादांना सोबत घेण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो असं थेट सांगून टाकलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola