Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?
Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?
आजचा दिवस महाराष्ट्रातील राजकीय प्रतीक्षा संपवणारा दिवस म्हणावा लागेल... ( आधी मी तुम्हाला कोणाच्या प्रतीक्षा संपल्यात ते सांगते.. पहिलं - भावी नगरसेवक.. ज्यांची आज ९ वर्षांची प्रतीक्षा संपली.. दोन - बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक.. ज्यांनी ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची प्रतीक्षा संपली.. तीन - राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते.. ज्यांनी दोन्ही राष्ट्रवादी पुण्यापुरती का होईना.. एक होण्याची प्रतीक्षा संपली.. चार... महायुतीचं जागावाटप अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचलं.. म्हणून त्यांच्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली.. आणि पाच.. मुंबईत चर्चेची दारं बंद झालीएत म्हणत.. काँग्रेसनंही कार्यकर्त्यांची प्रतीक्षा संपवली..) (खरंतर.. २९ महापालिकांच्या निवडणुकां जाहीर झाल्या होत्या खऱ्या.. पण, महौल दिसत नव्हता... तोच महौल आज महाराष्ट्रात दिसतोय..) (या माहोलाचं कारण आहे दोन घराणी.... एक म्हणजे पवार आणि दुसरे ठाकरे... शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंमध्ये मैत्रीचे संबंध होते... पण राजकारणात दोघं कायमच एकमेकांचे राजकीय विरोधक होते.... बाळासाहेबांच्या हयातीतच त्यांचे पुतणे राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी वेगळा पक्ष काढला... बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरेंकडे पक्षाची सूत्रं आली... तरीही नंतर अनेक वर्षं ठाकरे आणि पवार कुटुंब राजकीय विरोधकच राहिले... मात्र २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर एक मोठं वादळ आलं आणि कधी नव्हे ते ठाकरे आणि पवार घराणी राजकीयदृष्ट्या जवळ आली... त्यावेळी एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि ठाकरेंचं शिवसेना हे 'राजकीय घराणं'ही फुटलं... आता या निवडणुकीच्या निमित्तानं अडीच दशकांपूर्वी दुरावलेले ठाकरे आणि अडीच वर्षांपूर्वी दुरावलेले पवार पुन्हा एकत्र येताना दिसतायत...
23 Dec 2025 आजच्या इतर बातम्या -
पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्याच्या एकीची पॉवर दिसणार, २६ तारखेला एकीची अधिकृत घोषणा, खुद्द अजित पवारांची माहिती...चर्चा सुरू असल्याचा सुप्रिया सुळेंचाही दुजोरा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद... पवारांचे निष्ठावान प्रशांत जगताप राजीनाम्याच्या वाटेवर... तर अजित पवारांसोबत जाण्यावरुन काँग्रेसमध्येही दोन मतप्रवाह..
उद्धव आणि राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची उद्या दुपारी १२ वाजता औपचारिक घोषणा, वरळीतील कार्यक्रमाकडे महाराष्ट्राच्या नजरा... मुंबई, पुण्यासह ७ महापालिकांमध्ये ठाकरेंची हातमिळवणी
राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर काँग्रेसचा सूर बदलला...आघाडीची वेळ निघून गेल्याचं सांगणाऱ्या काँग्रेसची चर्चेची तयारी...तर उद्याच्या पत्रकार परिषदेला पवार हजर राहिले तर आवडेलच, राऊतांचं वक्तव्य...