NCP Merger Sharad Pawar Sunetra Pawar : पडदा विलिनीकरणावर लक्ष 'पवार 'नीतीवर Special Report
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सर्वात जास्त चर्चेत राहिलेला प्रश्न... आतापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या प्रश्नावर नकारघंटा वाजवली जात होती... मात्र आता स्वतः शरद पवारांनीच ठरवलंय... विलिनीकरणाच्या चर्चांना फुलस्टॉप द्यायचा आणि कामाला लागायचं... शरद पवारांच्या या निर्णयामागे नेमकी काय राजकारण दडलेलं असू शकतं... पाहुयात...
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण व्हावं ही अजित पवारांची इच्छा होती...
असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नेहमीच करण्यात येत होता
मात्र आता शरद पवारांनी देखील ठरवलंय
विलिनीकरणाचा मुद्दा बाजूला ठेवून कामाला लागायचं...
शरद पवारांनी त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती..
या बैठकीत काय ठरलं हे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं.
All Shows
































