NCP Baramati Special Report: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कोण राखणार ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP Baramati Special Report: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कोण राखणार ? एखाद्या कुटुंबात फूट पडली की वाटण्या होतात.. घरापासून ते जमिनीच्या बांधापर्यंत प्रत्येक गोष्टीची वाटणी होते.. अशीच गत आता पवार कुटुंबाचीही झाल्याचं दिसतंय. पण इथे जमीन जुमल्याची वाटणी नाहीये इथे लढाई पक्षासाठी, लढाई पक्षाच्या चिन्हासाठी, लढाई अध्यक्षपदासाठी, लढाई राजकीय वारसासाठी आहे.. पक्षात फूट पडली आणि कुटुंबही दुरावलं.. कालपर्यंत एकमेकांसाठी एकजुटीने राजकारणाच्या मैदानात उतरणारी मंडळी आता एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. काका पुतण्यातील वारसा हक्काच्या वाटणीचा वाद काही नवा नाही..बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडून राज ठाकरेंनी नवा पक्ष स्थापन केला, गोपिनाथ मुंडेंची साथ सोडून धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.. अनेकदा वारसदाराच्या लढाईतूनच कुटुंब विभागल्याचं महाराष्ट्राने पाहिलंय आणि त्यात आता भर पडलीये. ती पवार कुटुंबाची..यानिमित्ताने प्रश्न उपस्थित झालाय पवार कुटुंबाचा वारसदार कोण?