Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 21 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

 Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 21 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

भारतीय जनता पक्षाने आज (दि.20) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान, विशेष म्हणजे भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीला पहिल्याच यादीतच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीजया चव्हाण भोकरमधून लढताना दिसणार आहेत. दरम्यान, लेकीला पहिल्याच यादीत उमेदवारी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   पहिली निवडणूक आहे उत्साह पण आहे , भीती पण आहे : अशोक चव्हाण  अशोक चव्हाण म्हणाले,  श्रीजया चव्हाण यांना उमेदवार दिली या बद्दल पक्ष नेते आणि पक्षाचे व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. सामाजिक राजकीय क्षेत्रात श्रीजया चव्हाण चांगली सुरुवात करेन. मला या मतदारसंघाने चांगली साथ दिली. मला खात्री आहे चांगल्या मताने श्रीजया चव्हाण निवडून येईल. पक्ष आणि पक्ष नेत्याचे आभार मानतो. श्रीजया हिची पहिली निवडणूक आहे उत्साह पण आहे , भीती पण आहे. चव्हाण घराण्याचे  नाव आणि जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. ही मोठी जबाबदारी आहे . ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची आहे. ती जबाबदारी पुढे घेऊन मी जाईल मला विश्वास आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram