नवज्योतसिंग सिद्धू यांची नवी इनिंग सुरू, सिद्धू आणि अमरिंदर सिंह यांच्यात कोल्ड वॉर कायम
चंदीगड : पंजाब काँग्रेसचे नवे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात माथा टेकवला. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योतसिह सिद्धू यांच्यातील वाद कायम असून मुख्यमंत्र्यांनी सिद्धू यांना सार्वजनिकरित्या आपली माफी मागण्याचा आदेश दिला आहे. तर सिद्धू यांनी अशी माफी मागण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होत असून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याचं चित्र आहे. पण त्या आधीच पंजाब काँग्रेसमध्ये कलह सुरु झाला. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योतसिंह सिद्धू असा वाद रंगला असून पक्षाच्या हायकमांडने यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.