Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
नांदेड : जिल्हातील (Nanded) लोहा नगर परिषदेच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने (BJP) चक्क एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे, घराणेशाहीवरुन काँग्रेसवर सातत्याने हल्लाबोल करणाऱ्या भाजपाच्या (BJP) भूमिकेवरुन राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली होती. लोहा नगरपरिषदेच्या (Nagarpalika results) नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली. तर, नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली होती. मात्र, जनतेनं या सर्वांना नाकारले असून घराणेशाहीला थारा नसल्याचं दाखवून लोकांनी दाखवून दिलं. भाजपने एकाच घरातील सहा जणांना तिकीट दिल्याने जिल्ह्यात ही नगरपरिषद चर्चेचा विषय बनली होती. इथे नगराध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.
नांदेड जिल्ह्याचं लक्ष लोहा नगर परिषदेकडे लागलं असून भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पहायला मिळाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बाल्लेकिल्ला मानला जातो. आतापर्यंतच्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व राहिले आहे. लोहा नगर परिषद एकूण दहा प्रभाग असून 20 नगरसेवकांसाठी ही निवडणूक होतं आहे. मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे गटासह सर्वच पक्षातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजपने या निवडणुकीत सर्व जागेवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असले तरी एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली होती. ज्यात नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तसेच पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी यांना (प्रभाग ७ अ) मधून, भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांना (प्रभाग क्रमांक १ अ) मधून, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी (प्रभाग ८ अ) मधून, मेव्हुणा युवराज वसंतराव वाघमारे (प्रभाग क्रमांक ७ ब) मधून, भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे (प्रभाग क्रमांक ३) मधून उमेदवारी देण्यात आली होती.