Mumbai Controversy : 'बॉम्बे'चा डाव, 'मुंबई'वर घाव? आयआयटी बॉम्बे की आयआयटी मुंबई? Special Report
Mumbai Controversy : 'बॉम्बे'चा डाव, 'मुंबई'वर घाव? आयआयटी बॉम्बे की आयआयटी मुंबई? Special Report
IIT मुंबईमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मांडलेलं हे मत....
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहत असताना...
तसंच शाळेत पहिलीपासून हिंदी शिकवण्यावरून राजकारण तापलं असताना....
आणि सत्ताधारी भाजपचा मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव आहे, असा आरोप होत असताना....
मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला नसता तरच नवल...
IIT बॉम्बे का? IIT मुंबई का नाही...?
या प्रश्नावर सगळ्याच पक्षाचे बडे चेहरे व्यक्त होऊ लागले..
मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावर बोट ठेवताना राज ठाकरेंनी थेट मोदी सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केलाय
जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे....मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेते आणि जनतेनं उधळून लावला...आणि मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली...गेल्या अनेक दशकांची यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा ओकायला सुरुवात केली आहे...खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.