✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश

एबीपी माझा वेब टीम  |  20 Dec 2025 10:22 PM (IST)
ABP News

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एक अत्यंत प्रेरणादायी बातमीने बुलेटीनची सुरुवात करुयात..
श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव या दुर्गम गावातील एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांनी एमपीएससी लखलखीत यश मिळवलं आहे. दोघा भावांच्या पावलावर पाऊल टाकत तिसरा भावानेही प्रशासकीय सेवेत स्थान मिळवलंय.
ग्रामीण भागातून, प्रतिकुल परिस्थितीवर मात करत चंदन कुटुंबानं मिळवलेलं हे यश आज अनेक तरुणांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
पाहूयात हा खास रिपोर्ट…
गाव खेड्यातील विद्यार्थ्यांचं यश हे नेहमीच प्रेरणा देणारं असतं…  तसंच यश मिळवलंय श्रीगोंदा तालुक्यातील उखलगावच्या मुलांनी तिथे चंदन कुटुंबातील तीन सख्ख्या भावांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवत दुर्मिळ कामगिरी केली आहे. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असू शकते. अतिशय प्रतिकूल परिस्थिती… दुर्गम भाग… आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण… या सगळ्यावर मात करत अजय मालन चंदन यांनी राज्य कर निरीक्षक
अजय यांचे मोठे भाऊ दिलीप मालन चंदन हे सध्या नागपूर गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत…  तर दुसरे भाऊ विजय मालन चंदन हे पुण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत…  तिसरे भाऊ विनोद चंदन हे बांधकाम व्यावसायिक आहेत.  विशेष म्हणजे दिलीप आणि विजय हे दोघेही सुरुवातीला शिक्षक होते…  मात्र एमपीएससी परीक्षेचा ध्यास घेत त्यांनी २०१० आणि २०१२ साली पोलीस सेवेत प्रवेश केला.  आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजय चंदन यांनीही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
इतकंच नव्हे तर, दिलीप चंदन अधिकारी झाल्यानंतर उखलगाव गावातून जवळपास १५ तरुणांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याचं ग्रामस्थ सांगतात.
अजय यांनी उखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलं… तर पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून समाजशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली. केडगाव, अहिल्यानगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी केली. तर २०२४ मध्ये राज्य कर निरीक्षक पदाची निवड निश्चित केली
सातत्य… जिद्द… चिकाटी… आणि योग्य नियोजन… याच्या जोरावर यश मिळवता येतं, असा संदेश देणारे चंदन कुटुंबातील हे तीन भाऊ आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. स्वतःपुरतं यश न ठेवता गावातील इतर मुलांनाही दिशा देणारी ही यशोगाथा निश्चितच कौतुकास्पद आहे. सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहिल्यानगर

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.