Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
बांग्लादेशात सध्या हिंसाचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही भागांमध्ये भारतविरोधी आणि हिंदूविरोधी घोषणांसह आंदोलनं सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. भारत सरकारकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. पाहुयात हा रिपोर्ट
गेले वर्षभर हिंसाचारात धुमसत असलेल्या बांग्लादेशात, पुन्हा एकदा भारत विरोधी, हिंदू विरोधी हिंसाचाराची आग पसरु लागली आहे. ईशान्य भारतावर कब्जा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थी नेत्याची.. उस्मान हादीची हत्या झाली आणि ढाका, चितगाँगसह विविध भागात हिंदू द्वेष पुन्हा उफाळून आला तो इतका वाढला की एका हिंदू तरुणाची जमावानं जाळून हत्या केली. प्रेषित मोहम्मदाविरुद्ध अवमानकारक बोलल्याचा आरोप करत धर्मांध मुस्लिमांनी दिपूचंद दास या हिंदू तरुणाला आधी झाडाला बांधून मारहाण केली नंतर झाडाला बांधलेल्या अवस्थेतच त्याला पेटवून दिलं. दीपूचंदच्या हत्येनंतर धर्मांध जमावाने अल्लाह हू अकबर चे नारे दिले
जुलै महिन्यात अशाच हिंसक आंदोलनानंतर शेख हसीनांना देश सोडून पळावं लागलं होतं,
आता सुद्धा आंदोलक आणि सुरक्षादलांमध्ये वाद वाढले आहेत.
भारतीय उपउच्चायुक्तांच्या कार्यालयावरही आंदोलकांनी हल्ला केला.
पोलिसांवर दगडफेक करणे, वाहनं जाळणे आणि सार्वजनिक वारसा स्थळांची तोडफोड, माध्यमांच्या कार्यालयांना आगी लावणे असा प्रकार तिथे सुरु आहे.
निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आहेत, त्या होऊ देणे किंवा होऊ न देणे यावर ही हिंसा किती पसरणार ते अवलंबून असेल. बांग्लादेशात वाढती असहिष्णुता आणि राजकारणात हिंदू समाजाला लक्ष्य केलं जात आहे. तिथे अमेरिका, चीन, पाकिस्तानचा हस्तक्षेप बघता भारताला डोळ्यात तेल घालून सावध राहावं लागणार आहे