Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
आसाममधील होजाई जिल्ह्यात शनिवारी सकाळी हत्तींच्या एका कळपाला, रुळ ओलांडताना सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसनं धडक दिली. या अपघातात सात हत्तींचा मृत्यू झाला आणि एक पिल्लू जखमी झालंय. ट्रेनचं इंजिन आणि पाच डबेही रुळावरून घसरले. पाहुयात हा रिपोर्ट
हत्ती...जंगलातील एक अवाढव्य, संवेदनशील आणि बुद्धिमान प्राणी कळपात राहायचं आणि अन्नाच्या शोधात पुढे जायचं अशी हत्तींची रोजनिशी... असाच एक हत्तींचा कळप आसामच्या होजाई जिल्ह्यात मध्यरात्री एका गावातून दुसरीकडे जात होता... सोबत एक छोटसं पिल्लूही कळपासोबत बागडत चाललं होतं... पण वाटेत काळ बनून रेल्वेचा रुळ आडवा आला... काही अंतरावरुन अतिशय वेगानं सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस येत होती लोको पायलटला हा हत्तींचा कळप दिसला आणि त्यानं तातडीनं इमरजन्सी ब्रेक दाबला... रेल्वेच्या भयानक धडकेत ८ निष्पाप जीवांचा तडफडून मृत्यू झाला... हत्तीचं पिल्लू जखमी अवस्थेत बाजूला पडलं... रेल्वेचं इंजिन आणि ५ डबे रुळावरुन घसरले... रेल्वे प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला...
या भीषण अपघातानं मानव आणि हत्तींमधील संघर्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय...
अपघात झालेला परिसर हत्तींचं अधिकृत कॉरिडॉर नव्हता आसामसह पूर्वेकडच्या राज्यात हत्तींच्या अपघाती मृत्यूचं प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढलंय २०१९ ते २०२४ या काळात रेल्वे अपघातात ८० हत्तींचा मृत्यू झालाय याशिवाय शेतात अवैध कुंपणाचा शॉक लागणं, शिकार, वीषबाधा अशा विविध कारणांमुळे जवळपास ५२८ हत्तींचा जीव गेलाय
मुळात हत्तींवर ही वेळ आली त्याला कारण माणूसच... हा संघर्ष फक्त आसाममधला नाहीये... गेल्या काही महिन्यांपासून कोकण, गोव्यातही असाच चुकलेला ओंकार हत्ती फिरतोय महाराष्ट्रात पुणे, उत्तर महाराष्ट्रापासून नागपूरमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढलेत... असा मोठा अपघात झाला की काही वेळ हळहळ व्यक्त होते, मोठ्या उपाय योजनांच्या केवळ वल्गना केल्या जातात... विकास हवाच...पण विकासाच्या नावाखाली जंगलं ओरबाडताना तिथल्या मुक्या प्राण्यांचं काय, याचं भान राखायला हवं...