Mumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy Shole
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई: किनारी रस्ता प्रकल्पातील उत्तरवाहिनी मार्गिकेवरील वांद्रे-वरळी सागरी सेतुला जोडणाऱ्या पुलाचा आज लोकार्पण सोहळा आज पार पडला. या पुलामुळे इंधन बचत होणार आहे आणि लवकर ब्रिज क्रॉस करता येणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळही वाचणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना या कामाचे भूमिपूजन झाले. नंतर मी मुख्यमंत्री असताना या विकासकामाला गती मिळाली. तर महायुती सरकारच्या काळात सुरू झालेलं काम आता तिसऱ्या टप्प्यात देवेंद्रजीच्या काळात पूर्ण झालं आहे.
आपण जर वरून हा प्रकल्प पाहिला तर आपण परदेशातील ब्रिज बघत आहे, असं लोकांना वाटतं. आता काही लोकांना वरळीत जास्त वेळ एंजॉय करता येईल. किंबहुना सरकार बदललं नसतं तर तुम्हाला आज काहीच दिसल नसतं. एमटीएनएल ब्रिज सुद्धा पहिला मिळाला नसता. असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागरी सेतुला जोडणाऱ्या पुलाबाबत भाष्य केलं आहे.