Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP Majha

Continues below advertisement

Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा गौरव ABP Majha

हे देखील वाचा 

मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके

सांगली : किरकोळ वादातून हाणामारीच्या घटना नवीन नाहीत. मात्र, किरकोळ कारणातून उद्भवलेला वाद चक्क एका निष्पाप कामगाराच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईलचे स्क्रीन गार्ड कमी दरात देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी मोबाईल दुकानातील एका कामगाराचा चाकू आणि कोयत्याने वार करत  खून केल्याची धक्कादायक घटना सांगली (Sangli) शहरात घडली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी (Police) तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केल. सांगली बस स्थानकाजवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल (Mobile) शॉपीमध्ये ही खुनाची घटना घडली असून विपुल अमृत पुरी गोस्वामी असे खून झालेल्या दुकानातील कामगाराचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काही वेळातच आरोपींना अटक केली आहे.   

मोबाईल दुकानात ग्राहक बनून आलेल्या हल्लेखोरांनी 100 रुपयांचे स्क्रीन गार्ड 50 रुपयांना मागितले होते. मात्र, दुकानातील कामगाराने ते 50 रुपयांत देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यातूनच 4 तरुणांनी चाकू आणि कोयत्याने वार करत दुकानातील कामगाराचा निर्घुणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, त्यानंतर तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले. मात्र, विनाकारण क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद एका कुटुंबीयांवर मोठा दु:खाचा आघात देऊन गेला. घरातील कर्ता तरुण गेल्याने गोस्वामी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram