Ambadas Danve Vs Sandeepan Bhumre | अंबादास दानवेंची भुमरेंसोबत जवळीक? Special Report

Continues below advertisement

 छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये राजकीय नाट्य पाहायला मिळालं. यावेळी विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या जवळ बसण्याच टाळलं. तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील खैरेंच्या बाजूला न बसता थेट भुमरेंच्या बाजूला जाऊन बसले. त्यामुळे सर्वांच्या उंचावल्या. यावेळी नेमक काय घडलं? पाहूया या खास रिपोर्टमधून. 

 

हे देखील वाचा 

Gondia Accident : गोंदियात बुलेरोची दुचाकीला मागून धडक, 5 महिन्यांच्या बाळासह तीन जणांचा दुर्दैवी अंत

Gondia Accident : गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या नवेगावबांध-बाराभाटी मार्गावर एका चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. मृत्यू झालेल्यांमध्ये मोरगाव अर्जुनी तालुक्यातील येरंडी / देवलगांव येथील 25 वर्षीय महिलेसह तिचा 5 महिन्याचा बाळ व घराशेजारी राहणारी 3 वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर दुचाकी चालक गंभीर जखमी असून त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. 

अधिकची माहिती अशी की, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी देवलगांव येथील संदिप राजु पंधरे (वय 29) हा युवक आपल्या मोटार सायकलने पत्नी चितेश्वरी पंधरे, मुलगा संचित पंधरे व घराशेजारी राहणारी पार्थवी सिडाम (3) यांचेसह दुचाकीने गावावरून नवेगावबांध येथे जात होता. दरम्यान बाराभाटी - नवेगावबांध मार्गावर मागून भरधाव येणा-या चारचाकी बुलेरो पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चितेश्वरी संदिप पंधरे, 5 महिन्याच्या चिमुकला संचित पंधरे व घराशेजारील पार्थवी सिडाम हे तिघेही जागीच ठार झाले. तर दुचाकी चालक संदिप राजू पंधरे हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहीती प्राप्त होताच नवेगावबांध पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले असून मृतकांना व जखमीला नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर जखमी संदिप पंधरे याला पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीला हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.  घटनेची नोंद नवेगावबांध पोलिसांनी घेतली आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram