Mumbai : परिवहन मंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न, ST आंदोलकांना आझाद मैदानातच रोखलं
abp majha web team
Updated at:
20 Nov 2021 10:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी संप लवकरात लवकर मागे घ्यावा, सरकार कुठेही आठमुठेपणाची भूमिका घेत नाही. उच्च न्यायालयाचा जो काही अहवाल असेल त्यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. कोणाच्यातरी सांगण्यावरुन, भडकवण्यावरुन एसटी कर्मचाऱ्यांनी स्वत:चे नुकसान करुन घेऊ नये असंही ते म्हणाले.
उच्च न्यायालयाने एसटीच्य विलीनीकरणासंदर्भात एक समिती नेमली आहे. समितीने यावर 12 आठवड्यात अहवाल द्यायचा आहे. त्या अहवालावर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं अनिल परब म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपाचा त्रास हा सामान्य लोकांना होत असून संप मागे घ्यावा आणि सामान्यांचा हा त्रास कमी करावा असंही अनिल परब म्हणाले.