Saif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...

Continues below advertisement

Saif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...

Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर (Saif Ali Khan) तीन दिवसांपूर्वी त्याच्याच घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला.  घरात घुसण्याआधी आरोपीनं सैफच्या घराची रेकी केली असल्याचं बोललं जात आहे. तब्बल तीन दिवसांनी पोलिसांनी सैफच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आता आरोपीच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

सुत्रांच्या वतीनं समोर येत असलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्य घरात घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहाजादनं अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली होती. वांद्र्यात राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटींची घरं हेरुन आरोपीनं रेकी केल्याची माहिती मिळत आहे. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खानच्या घरासह अनेक घरांची रेकी केली असल्याची माहिती मिळत आहे. वांद्र्यातून एका रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालककडून या सेलिब्रेटिंच्या घराची माहिती आरोपीनं मिळवली होती. त्यापैकी सैफ अली खानचं घर आतमध्ये घुसण्यासाठी अधिक सोयीचं वाटल्यानं आरोपीनं ते घर निवडलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram