Amravati : अष्टकोनी आकार अन् बारा दरवाजे! अमरावतीच्या पवनी गावातील मुघलकालीन ऐतिहासिक विहीर
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
20 Jun 2021 09:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती : आपण अनेक सुंदर अशा पुरातन विहिरी बघितल्या असतील. काही भागात या विहिरीला "बावडी" असं देखील म्हणतात. राज्यात अनेक ठिकाणी पुरातन बावड्या आहेत. आपण आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या विहिरी पाहिल्या असतील. पण अमरावती जिल्ह्यात विहिरीत एक घर असल्याचं पाहायला मिळालं आहे. तेही पुरातन काळातील घर. विशेष म्हणजे या विहिरीत एक मंदिर देखील आहे.