Devendra Fadnavis speech : रोहितचा सिक्सर, सूर्याचा कॅच, फडणवीसांचं अष्टपैलू भाषण, विधानभवन गाजवलं
Continues below advertisement
Devendra Fadnavis speech : रोहितचा सिक्सर, सूर्याचा कॅच, फडणवीसांचं अष्टपैलू भाषण, विधानभवन गाजवलं
Team India Players Felicitation in Vidhan Bhavan : तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडियाने टी20 विश्वचषकावर नाव कोरले. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. टीम इंडियाचे देशभरातून कौतुकाचे वर्षाव होत आहे. या विजयात महाराष्ट्रातीलही खेळाडूंचा मोठा वाटा आहे. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैयस्वाल टीम इंडियाचे सदस्य होते. या सर्वांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना रोहित शर्माने आपल्या खास शब्दात भाषण केले. रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या झेलवरुन केलेल्या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला. बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं, असं मस्करीत रोहित शर्मा म्हणाला.
Continues below advertisement