Amit Thackeray on Modi : मोदींचा फोटो हटवला, अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल Special Report
सध्या जेन झीशी कनेक्ट करण्याचा प्रत्येक पक्षाकडून, नेत्याकडून प्रयत्न सुरू आहे.. मनसे प्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे देखील पुण्यातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पोहोचले.. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर जाब विचारण्यासाठी ते प्राचार्यांच्या कार्यालयात धडकले.. मात्र त्या कार्यालयात अमित ठाकरेंकडून एक अशी कृती घडली, की त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. पुण्यातल्या कॉलेजमध्ये अमित ठाकरेंच्या हातून असं नेमकं काय घडलंय ? त्यांची कृती योग्य होती की अयोग्य? पाहुयात आमचे प्रतिनिधी मिकी घई यांचा हा स्पेशल रिपोर्ट...
हा सीन आहे अमित ठाकरेंच्या पुणे दौऱ्यातला....
पुण्यातल्या गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमधल्या दूरवस्थेची पोलखोल करण्यासाठी...
अमित ठाकरे तुकाराम मुंढेंच्या एफडीए स्टाईलनं कॉलेजची पाहणी करत होते...
कॉलेजमधल्या वेगवेगळ्या समस्यांवर जाब विचारण्यासाठी ते प्राचार्यांच्या कार्यालयात धडकले
तेवढ्यात एका विद्यार्थ्यानं अमित ठाकरेंचं लक्ष,
छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मधोमध लावलेल्या पंतप्रधान मोदींच्या फोटोकडे वेधलं
अमित ठाकरेंकडून सूचना मिळताच एकानं फोटो लावलेल्या भिंतीकडे धाव घेत मोदींचा फोटो काढला..
आणि मनसे समर्थक विद्यार्थ्यांनी विजयी जल्लोषात टाळ्या वाजवायला सुरूवात केली..
शासकीय नियमावलीनुसार शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कार्यालयात लावलेला पंतप्रधान मोदींचा फोटो का हटवला?
असा प्रश्न माध्यमांनी अमित ठाकरेंना विचारला..
तेव्हा त्यांचा युक्तिवाद काय होता? तुम्हीच ऐका
All Shows
































