5 कोटींच्या अॅथलेटिक ट्रॅकवर मंत्र्यांच्या गाड्या पार्क, केंद्रीय क्रीडा मंत्री रिजिजू यांनी फटकारले
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
28 Jun 2021 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे : पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी अॅथलेटिक्स ट्रॅकवर वाहने गेल्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. मंत्री व इतर मान्यवरांना लिफ्टने दोन मजले चढावे लागू नयेत, म्हणून त्यांची वाहने थेट अॅथलेटिक्सच्या कृत्रिम धावपट्टीवर आणण्यात आली होती. याची दखल केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी घेतली असून क्रीडा संकुलाला फटकारले आहे.