Maratha Reservation : मराठा समाजाला किती आणि कुठे आरक्षण? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२२ मार्च १९८२... ४२ वर्षांपूर्वीची ही तीच तारीख आहे, ज्य़ादिवशी मराठा आरक्षणासाठीची मशाल पहिल्यांदा पेटली... माथाडी नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणासाठी मुंबईत पहिला मोर्चा काढला आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा काळानुसार पुढे येत राहिला... लाखोंचे मूक मोर्चे झाले, क्रांती मोर्चे झाले, रास्तारोको झाले आणि उपोषणंही झाले... मराठा बांधवांच्या एकजुटीला या वाटेत अनेक नेतेही भेटले... मात्र या मागणीला खरा जोर आणि रेटा लावला तो मनोज जरांगे यांनी... त्यांच्या उपोषणावर लाठीमार झाला आणि अखंड महाराष्ट्रातला मराठा बांधव पेटून उठला... मराठा आरक्षणाचा लढा एखाद्या वणव्यासारखा दऱ्याखोऱ्यांतून पसरला... या सगळ्या गोष्टीला आता मूर्त स्वरूप मिळालंय. ते सरकारने विशेष अधिवेशनात मंजूर केलेल्या विधेयकामुळे... मात्र मनोज जरांगे अजूनही समाधानी नाहीत... म्हणून मराठा आरक्षणचा प्रवास अजून थांबलेला नाही... तो कुठपर्यंत जाणार आणि कोणत्या मार्गाने जाणार? या प्रश्नांबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात...