ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मराठी आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी डागली तोफ, बाहेरचे लोंढे येत राहिल्यास ठाण्याचा विकास होणार नाही, राज ठाकरेंचा घणाघात
फोडाफोडीचं राजकारण मला कधीही मान्य नाही, कळव्याच्या सभेत राज ठाकरेंचं वक्तव्य...महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरुवात केल्याचा आरोप...
माझा बाप चोरला म्हणता मग बाळासाहेबांवर टीका करणाऱ्यांना पक्षाचे नेते कसं करता, सुषमा अंधारेंचं जुनं वक्तव्य दाखवत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा, ही मोदींची नीती, मुंबईतून उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल.
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यासाठी उद्या ११ जागांसाठी मतदान, पंकजा मुंडे, अमोल कोल्हे, खडसे, यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला
दिल्लीतल्या दोन खेचरांना फक्त पवार आणि ठाकरेच दिसतात, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा मोदी शाहांवर हल्लाबोल, तर ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा, बावनकुळेंची टीका
उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं, मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा