Raj Thackeray On Sushma Andhare : लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओ

ठाणे : शिवसेना (Shiv Sena) सोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पहिल्यांदाच आनंद आश्रमात दाखल झाले. राज ठाकरे सभेआधी ठाणे येथील आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) दाखल झाले. तेथे त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. राज ठाकरे यांची श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कळवा येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे.

19 वर्षांनी राज ठाकरे पहिल्यांदा आनंद आश्रमात

राज ठाकरे आनंद आश्रमात पोहोचताच नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. शिवसेना सोडल्यानंतर 19 वर्षांनी राज ठाकरे पहिल्यांदा आनंद आश्रमात पोहचले. यामुळे शिवसैनिकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी येथे मोठी गर्दी केली होती.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola