Mahayuti Politics : 50 खोके, महायुतीत खटके, राजकारणात काढली एकमेकांची कुंडली Special Report
राजकारणात विरोधकांवर टीका करण्यासाठी तयार होणारी घोषणा ही कालांतरानं विस्मृतीत जाते. मात्र काही घोषणांचं आयुष्य मात्र मोठं असल्याचं दिसतं. विशेष म्हणजे विरोधकांनी तयार केलेली घोषणा ही जेव्हा मित्रपक्षांकडून वापरली जाते, तेव्हा त्याची जास्तच चर्चा होते. अशीच चर्चा सध्या सुरु झालीय हिंगोलीत. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सध्या एकमेकांवर तुटून पडलेत. नेमकं काय घडतंय, पाहूया राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट
((पन्नास खोके एकदम ओकेच्या जुन्या घोषणांनी ओपन करावे. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून दिल्या गेलेल्या घोषणा. शिवसेना फुटल्यानंतरचे पहिले अधिवेशन))
व्हिओ -
तीन वर्षं उलटून गेली तरी पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा राजकाऱणात अजूनही टिकून असल्याचं दिसून येतंय.
तीन वर्षांपूर्वी ज्या घोषणेचा वापर विरोधक करायचे, त्या घोषणेचा वापर आता मित्रपक्षच शिंदेंच्या शिवसेनेविरोधात करू लागल्याचं चित्र आता समोर येतंय.
निमित्त आहे हिंगोली नगरपालिका निवडणुकीचं.
एकमेकाविरोधात लढणारे शिंदेंचे आमदार संतोष बांगर आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलंय.
बांगर यांच्यावर टीका करताना मुटकुळेंनी ५० कोटींचा संदर्भ आणला आणि वातावरण गरम झालं.
बाईट - तानाजी मुटकुळे
Z:2811HINGOLITanhaji Mutkule byte
((अनेक गावात संतोष बांगर यांना ५० खोके एकदम ओके आस म्हणत हिणवण्याचे काम नागरिकांनी केलं त्यांनी ते पैसे घेतले आस जनमत आणि माझाही मत आहे ))
व्हिओ -
आता मुटकुळेंनी ५० कोटींचा वार केल्यानंतर बांगरांनी २० कोटींचा पलटवार केला.
बाईट - संतोष बांगर
etxm hingoli bangar on mutkule byte 281125 TH
((हे आमदार लबाड लांडगं आहे. २०१४ च्या आधी याच्याकडे काय होतं. आज २० कोटीचा बंगला बांधलाय त्यानं. कुठून आला. ))
व्हिओ -
दोघांनीही एकमेकांवर आरोप केल्यानंतर हा वाद संपेल असं वाटत असताना प्रत्यक्षात मात्र तो अधिकच भडकला.
आपण हवेली बांधण्यासाठी २० कोटी कुठून आणले, याचा हिशेब देत मुटकुळेंनी बांगर यांच्यावर पुन्हा पलटवार केला.
बाईट - तानाजी मुटकुळे
Z:2811HINGOLITanhaji Mutkule byte
((मी वीस कोटी रुपयांचा बंगला बांधला ते काही लपून थोडे आहे १५०० एकर जमीन माझ्या आजोबाची गावी आहे त्यामुळे मी काही भिकारी नाही सुरुवातीपासून आम्ही जमीनदार माणस आहोत))
व्हिओ -
गेल्या तीन वर्षांपासून महायुतीच्या छत्राखाली एकमेकांना सांभाळून घेणारे हे नेते नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं मात्र आमनेसामने आलेत.
त्यामुळं गेली तीन वर्षं हे नेते एकमेकांविषयी बोलत होते, ते खरं की आत्ता जे बोलतायत ते खरं, असा प्रश्न जनतेला पडलाय.
आरोपांच्या या चिखलफेकीनंतर मतदार कुणाला ओके म्हणतात आणि कुणाला खोके देतात, हे येत्या ३ तारखेलाच स्पष्ट होईल.
माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली.