Mahavikas Aghadi Special Report : कुणी मोठा भाऊ, कुणी छोटा भाऊ नाही! विधानसभा जागेवरून वाद?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahavikas Aghadi Special Report : कुणी मोठा भाऊ, कुणी छोटा भाऊ नाही! विधानसभा जागेवरून वाद?
हे देखील वाचा
Raksha Khadse : एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये पॅचअप होणार? मंत्री रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या...
Raksha Khadse जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघातून (Raver Lok Sabha Constituency) भाजपच्या तीन टर्म खासदार राहिलेल्या रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यांच्यावर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज प्रथमच रक्षा खडसे रावेर मतदारसंघात दाखल झाल्या. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पत्रकारांशी संवाद साधताना रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत आणि गिरीश महाजन-एकनाथ खडसे यांच्या वादाबाबत महत्वाचे भाष्य केले आहे.
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता रक्षा खडसे म्हणाल्या की, नाथाभाऊ हे मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील. योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईल, असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.