Ajit Pawar Modi Sabha : मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?

Continues below advertisement

Ajit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदान येथे जाहीर सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांची संध्याकाळी सहा वाजता सभा पार पडणार आहे. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा मोदी आज घेणार आहेत. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार नरेंद्र मोदींच्या मुंबईतील या सभेला गैहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल मुंबईतील सभेला नसतील, असं सांगण्यात येत आहे. मात्र असे असलं तरी अजित पवारांचं नरेंद्र मोदींच्या सभेला गैहजर राहण्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कालच अजित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना बटेंगे तो कटेंगे हा नारा आम्हाला मान्य नाही, असं म्हटलं होतं. आम्ही शाहू,फुले आंबेडकरांच्या विचारसणीने जाणारा पक्ष आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज अजित पवार नरेंद्र मोदींच्या सभेला उपस्थित राहणार नसल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram