Dhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार
Dhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार
विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे. महायुती म्हणून भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी माध्यमातून निवडणूक लढण्याच ठरलं. त्यावेळी मी विद्यमान आमदार असताना पंकजाताईंनी (Pankaja Munde) मोठं मन केलं. त्यामुळे मी आज इथे असल्याचं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटले. परळी विधानसभा मतदारसंघात (Parli Vidhan Sabha) बरदापुर गावात आयोजित सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे यांच्या आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार राजकीय फटकेबाजी केली. परळीत तुतारीकडून 11 लोकांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, मिळणार होती एकालाच, मीच त्यांच्या नेत्याला म्हणालो की लवकर तिकीट फायनल करा नाहीतर दोघातिघांना कागद वेचण्याची वेळ येईल. जे निष्ठावंत होते त्यांना उमेदवारी दिली नाही. मात्र, जे बाहेरून आले त्यांना उमेदवारी देण्यात आली. ती उमेदवारी कशासाठी दिली असेल तुतारीला जिंकण्यासाठी की परळी मतदारसंघात जातीपाती धर्माचे राजकारण अशाच पद्धतीने तेवत ठेवायचे यासाठी? असा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडेंनी अप्रत्यक्षरीत्या शरद पवारांना लक्ष केले. परळीतील बुथवर विशेष सुरक्षा, दहशतीचा आरोप, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर आज याठिकाणी तुमच्या डोळ्यात डोळे घालून दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत मी तुमचे आशीर्वाद मागू शकतो कारण मी पाच वर्षांपूर्वी मी मतदारसंघासाठी जे शब्द दिले, ते जातपात न पाहता प्रामाणिकपणे पाळले. ही निवडणूक विधानसभेची लागली तेव्हा महायुती म्हणून महाराष्ट्रात एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय झाला. निर्णय झाल्यानंतर स्वाभाविकच मी येथील विद्यमान आमदार असल्याने आणि ताईने मन मोठं केल्यामुळे मी महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभा आहे. पण निवडणुकीच्या अगोदर मला असं वाटलं होतं, लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने जातीपातीचं, धर्माचं राजकारण झालं, मला त्यापुढे जाऊन बोलायचं आहे. विधानसभा निवडणुकीतही असे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. परळीत 11 जण तुतारीची उमेदवारी घेण्यासाठी शर्यतीत होते. यापैकी उमेदवारी तर एकालाच मिळणार ना? मी त्यांच्यातील एका नेत्याला म्हटलं, अरे लवकर उमेदवार जाहीर करा, उमेदवारी तर एकालाच देणार आहात. एकाला उमेदवारी मिळाली की दोन-तीन जण येडे होतील, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.