एक्स्प्लोर
Political Leaders Light Bill Special Report : महावितरणचे थकबाकीदार नेते, शेतकऱ्यांवर मात्र कारवाई
Political Leaders Light Bill Special Report : महावितरणचे थकबाकीदार नेते, शेतकऱ्यांवर मात्र कारवाई
रब्बीच्या हंगामात थकीत वीज बिल न भरल्याने शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केली जात आहे, तर ही कारवाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान चालू थकीत बिल भरणे अपेक्षित असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. मात्र अशातच मराठवाड्यातील अनेक राजकीय नेत्यांवर लाखो रुपयांची थकबाकी असताना देखील त्यांच्यावर कोणतेही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं, त्यामुळे खरिपाचा हंगाम पूर्णपणे हातातून गेलंय. त्यातून सावरत किमान रब्बी मधून तरी काहीतरी हातात येईल या अपेक्षेने शेतकरी पुन्हा एकदा।शेतात राबतोय. मात्र आधी आसमानी संकट आणि आता महावितरणाच्या सुलतानी संकटाचा शेतकऱ्याला सामना करावा लागतो, थकीत वीज बिल भरलं नाही म्हणून कृषी पंपाचे कनेक्शन खंडित केले जात आहे, कारवाई टाळण्यासाठी किमान एक बिल तरी भरावाच लागेल असं सरकारकडुन सांगण्यात आलंय. एकीकडे शेतकऱ्यांवर अशा प्रकारे कारवाई सुरू असताना दुसरीकडे मराठवाड्यातील शेकडो राजकीय नेत्यांचे कोट्यावधींची थकबाकी असताना सुद्धा कोणतीही कारवाई होत नाहीये, या राजकीय नेत्यांची थकीत वीज बिल पाहून तुमचेही डोळे फिरतील.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report



























